Friday, December 02, 2005

पुनरुक्ती

“अगं आई, परवा केतकी भेटली होती....” ... माझं वाक्य मध्येच तोडत आईने बोटांनी ४ आकडा दाखवला. आणि म्हणाली “चौथ्यांदा सांगते आहेस”. मी जराशी हिरमुसले. काय बिघडलं असतं आणखी एकदा ऐकलं असतं तर? पण ही बोटांनी खूण करण्यची प्रथा मीच पाडली असल्याने गप्प बसले. पण मी सांगत होते कारण मला खूप सांगावसं वाटत होतं म्हणून. केतकी अचानक भेटल्यामुळे मला इतका आनंद झाला होता की गेले ३ दिवस मी आमच्या शाळेतल्या आठवणींमधून बाहेर येऊच शकले नव्हते. आणि तो आनंद मला वारंवार व्यक्त करायचा होता.

असं काय बघताय? मी काही एकटी नाही जगात जी तीच तीच गोष्ट परत परत सांगते. खूप जणांना ही सवय असते. वेगवेगळ्या कारणांनी लोक गोष्टी परत परत सांगत राहतात. अनेकदा या पुनरुक्तीची सुरुवात “मी सांगितलं का गं तुला?” किंवा “तुला सांगायचंच राहिलं बघ” या नांदीने होते. यापुढे बहुधा काहीतरी बातमी असते. “अमुकला तमक्या college मध्ये admission मिळाली”, “तमुकनी job change केला”, “ढमक्याचं लग्नं ठरलं” वगैरे वगैरे. यापुढे काही वेळ अमुक, तमुक किंवा ढमुक या विषयावर चर्चा अपेक्षित असते. श्रोता पहिल्यांदा ऐकताना “अरे वा”, “आयला!”, “हो का?” अशा reactions देतो. रंगतदार चर्चाही होते. परत तीच बातमी जेंव्हा सांगण्यात येते, तेंव्हा फक्त “हं” येतो. पुढच्या वेळी “हो सांगितलंस तू मला” अशी warning दिली जाते. यानंतर मात्र “किती वेळा सांगशील तेच तेच” अशी बोळवण होते.

या प्रकाराचं १ अतिशय irritating रूप म्हणजे “सूचना”. आपण कुठे trek ला, किंवा interview ला जाणार असलो, की प्रत्येक सूचना हजार वेळा ऐकावी लागते. “धांदरटपणा करू नकोस”, “फार पुढे जाऊ नका” इ. इ. चा भडिमार चालू असतो. बर चुकून काही चुकलंच तर “हजार वेळा सांगून झालं, पण ऐकतंय कोण?” हेही ऐकावं लागतं. कधी आपल्याला एखादं काम सांगितलं जातं. ते आपण विसरणार याची खात्रीच असते घरच्यांना. मग “नाही, विसरशील परत... ” असं म्हणत अनेकदा त्याची आठवण करून दिली जाते. यामध्ये बहुधा जाता-येता एखादं बिल भरणे, कोणाचं काही सामान कुठेतरी पोचवणे किंवा आणणे, कपडे इस्त्रीला देणे आदि गोष्टी येतात. हे एका limit च्या पुढे गेलं, की आपण खरोखरच ते काम करणं विसरून जातो.

वयस्कर व्यक्तींना आपल्या भूतकाळात रमत, आठवणींमध्ये कोरलेले प्रसंग सांगायची खूप सवय असते. याबाबतीत मला चिपळूकर सरांची आठवण येते. कधीही त्यांना भेटायला गेलं, की त्यांच्या तरूणपणातला हा किस्सा ऐकावाच लागतो. “काय सांगू तुला, मी आमच्या Fergusson च्या कबड्डी team चा कॅप्टन होतो. आम्ही एक tournament जिंकली होती. एवढा विजेत्या team चा कॅप्टन होतो, पण आमच्या college मधली एक मुलगी माझं अभिनंदन करायला आली तेंव्हा जाम घाबरलो होतो. तिनं नुसतं अभिनंदन नाही केलं, तर shakehand करायला हात पुढे केला. माझा हात काय थरथरत होता म्हणून सांगू..... नाहीतर ही आजकालची पोरं.... गळ्यात गळे काय घालतात, पापे काय घेतात...” यानंतर मग class मधल्या एखाद्या मुलानी कसं प्रेमप्रकरण केलं, अभ्यासाकडे कसं दुर्लक्ष केलं आणि मग सरांनी त्याला कसं वठणीवर आणलं, याची कथा असते.

अर्थात काहीसा हा प्रकार आपणही करतो. Engineering च्या submission ला घातलेले घोळ, मारलेल्या nights, केलेल्या copies हा विषय अनेकदा निघतो. आपण किती इरसाल आहोत हे समोरच्याला पटवून देत आपण तेच किस्से घोळवत राहतो. पुरुषोत्तम, फिरोदिया करणारी मंडळी तालमीच्या वेळच्या आठवणी आळवत राहतात. तो आनंद काही आगळाच असतो.....
एकूण माझ्या लक्षात येतंय की माझा मुद्दा मांडता मांडता मी ही तेच तेच परत परत सांगते आहे. तेंव्हा आता आवरतं घ्यावं हे बरं.

7 Comments:

Blogger Pratik Pandey said...

'पुनरुक्ति' पढ़कर अच्‍छा लगा। आपकी लेखन शैली बहुत ही सरस और आकर्षक है। मेरे साथ तो समस्‍या यह है कि अगर किसी काम को करने के लिये मुझसे एक से ज़्यादा बार कहा जाए, तो मैं वो काम करना हमेशा ही भूल जाता हूँ।

1:40 AM  
Blogger सागर said...

भट / झेंडे मावशी... झकास लिहीतेस, मला एकदम स.प. माहवीद्यालयाच्या प्रांगनात आल्या सारखे वाटले...

तु कोणत्या माहवीद्यालयात होतीस? मी ब्रिहन महाराष्ट्र वाणिज्य माहवीद्यालयाचा विद्यार्थी आहे.

3:00 PM  
Blogger hemant_surat said...

रिपीट ह्या शब्दातच पीट आहे. जो विषय आपण सारखा सारखा पीटतो, तोच रिपीट करतो नाही का? आमच्या सौ. ंना मी जर अशी चार बोटे दाखवली तर ती म्हणते, "नाही कसं मी बायको आहे तुमचि. ऎकून घ्यावंच लागेल! आणि मग ती ऎकवतेच. मी मत्र तिला बोटं दखविण्याची संधीच देत नाही. एक्स्प्रेस्स त्रेन चलु करून स्टेशन येइपर्यंत थांबवतच नाही.
हेमंत पाटील- सुरत.

1:48 AM  
Blogger hemant_surat said...

नाम ही काफ़ी है! बोल अम्रुताचे. आधी वाटले की संत वांग्मयच असेल किंवा द्न्यानेश्वरी निरूपण तरी. पण हे जरा हटके आणि छान आहे.
हेमंत पाटील

7:51 PM  
Anonymous Anonymous said...

झकास आहे.

1:28 AM  
Blogger Hemant Nemade said...

nice to read. you write naturaal and hope to read some nice articles from you

9:46 AM  
Blogger Hemant Nemade said...

you write nicely. waiting for some nice articles

9:48 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home