Tuesday, September 27, 2005

माझं पेन सापडत नाहीये…..

माझं पेन कुठे सापडत नाहीये.... कुठे बरं ठेवलं होतं..... काहीच आठवत नाहीये.... हल्ली मी फार गोष्टी विसरायला लागले आहे..... साधं पेन कुठे ठेवलं हे लक्षात राहू नये महणजे काय? पण खरंच मला काही आठवत नाहीये.... परवा परवा तर इथे होतं... छे... परवा कुठलं... कधी बरं काढलं होतं बाहेर..... परवा आई मावशीचा बदललेला नंबर सांगत होती तेंव्हा.... नाही पण तो तर मी मोबाईल मध्येच save केला.... हो पण गाण्याच्या class मध्ये तर नक्कीच वापरलं असेल ना.... ते थोडंच मोबाईल वर store करता येतं.... नाही पण परवा माझ्याकडे पेन नव्हतंच की..... खूप दिवसांनी गेले ना class ला... पिशवीत नव्हतंच मुळी.... वाण्याची यादी करायला काढलं होतं का? पण ते पेन तर आईंचच होतं...... यादी पण त्यांनीच केली की....
हां.... बहुधा नवीन computer चं bill द्यायला चेक लिहायला घेतलं असेल.... छे पण मी तर credit card नीच payment केलं होतं... exactly, credit card चं बिल भरायला चेक लिहिला असेल.... नाही. तोही हल्ली मी online bill pay वापरूनच भरते.... मग कधी बरं मी पेन वापरलं होतं याआधी? अरे हो.... राखीपौणिँमेला पत्र लिहिते मी दर वषीँ भावांना राख्या पाठवताना....तेंव्हा दर वषीँ एक छान पेन विकत घेते.... पण या वषीँ काही मी घेतलं नाहीये......हल्ली मराठीत cards मिळतात ना तीच पाठवली होती सगळ्यांना....पण पत्रं जरी लिहिली नाहीत तरी पाकिटावर पत्ते घालायला.....नाही.... लग्नाच्या वेळी खूप पत्ते लिहावे लागतील म्हणून सगळ्यांच्या पत्त्यांचं एक document करून ठेवलं आहे... लागेल तेंव्हा print out काढायचा आणि चिकटवायचा की काम झालं.... दिसतंही नीट नेटकं...
काय म्हणालात? Office मध्ये कोणी घेतलं का? अहो office मध्ये कशाला कोण माझं पेन घेईल? Paperless office आहे आमचं... मी join होऊन दीड वषँ झालं... join झाले तेव्हा एक वही दिली होती खरी मला... पण मध्ये office shift झालं तेव्हा कुठेतरी गेली वाटतं... तेव्हाच पेनही हरवलं असावं...
काय म्हणालात? मी खूप दिवसात पेन वापरलंच नाही....... खरंच की.... आणि आत्ता तरी मला कशाला हवं आहे काय? अहो आज TV वर जुन्या गाण्यांचा program आहे, आणि त्यात माझं आवडतं “लिख्खे जो खत तुझे” लावणार आहेत... मला ना त्यातलं एक कडवं येत नाही... ते मिळालं तर लिहून घ्यावं म्हणून कागद पेन शोधत होते....
हुशार आहात बरं का... हे handycam वर record करायचं काही मला सुचलं नव्हतं... तसंच करावं.. नाहीतरी पेन सापडत नाहीच्चे!

Monday, September 26, 2005

First blog

Writing my first blog. Yet to be familiar with the blogworld.
Amruta